Osmanabad : शेतातील सोयाबिन क्षेत्रात पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट | Sakal Media |

2021-09-30 776

चेतनच्या नशिबी दुहेरी दुःख, पत्नी दगावली आता नैसर्गिक संकट ओढावले !
उमरगा (जि.उस्मानाबाद) : सततच्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबिनच्या राशी थांबल्या आहेत तर अनेकांच्या शेतातील सोयाबिन क्षेत्रात पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे आभाळ कोसळत आहे. दरम्यान नाईचाकूर येथील चेतन राम पवार यांच्या दिड एकर क्षेत्रातील आंतरपिक असलेले सोयाबिन पूर्णतः पाण्यात गेले आहे.
उमरगा तालुक्यात गेल्या चार, पाच दिवसापासुन पावसाची सततधार सुरू आहे, काढणीला आलेले सोयाबिन पाण्यात अडकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांही शेतकऱ्यांनी काढणी करून गंजी केल्या आहेत मात्र पावसामुळे राशी शक्य होत नाहीत.
(व्हिडिओ - अविनाश काळे, उमरगा)

Videos similaires